--
बसमध्ये मास्कचा वापरच नाही
वाशिम: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्याप कोरोना संसर्गाचा धोका दूर झाला नाही. तथापि, एसटी बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मास्क वापरत नसल्याचे दिसते.
----
कृषी अवजारांच्या वापराबाबत प्रशिक्षण
वाशिम: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, (पोकरा) वाशिम पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या वतीने कृषी अवजार बँक लाभार्थींच्या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात लाभार्थींना कृषी अवजारांचा वापर, देखभाल, दुरुस्ती व वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
----
३० वर्षांपासून पाणंद रस्त्याची दैना!
दगड उमरा: वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील पाणंद रस्त्याची अवस्था गेल्या ३० वर्षांपासून अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात विविध कामासाठी वाहने, बैलगाडी घेऊन जाणे कठीण झाले असून प्रशासनाकडे मागणी करूनही हा प्रश्न निकाली निघाला नाही.
--------
पाणंद रस्त्याचे काम रखडलेलेच
वाशिम: कारंजा तालुक्यातील लोहगाव परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी सरपंचांकडे गुरुवारी केली.
--------------------
वाशिम-पुसद मार्गावर वाहतूक कोंडी
वाशिम: वाशिम-पुसद महामार्गावरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांची पुसद वाशिम महामार्गावरील दगड उमराफाट्यानजीक मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे.
-------