महावितरणच्या अनसिंग येथील कनिष्ठ अभियंत्यांकडे अनसिंगसह पिंपळगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा प्रभार आहे. या दोन उपकेंद्रांसह वाई-वारला या उपकेंद्रांचीही जबाबदारी ते सांभाळत असून, या सर्व उपकेंद्रात थकीत देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणचे पथक वीजजोडण्या खंडित करीत आहे. दुसरीकडे परिसरातील गावांत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असताना उन्हाळ्याच्या दिवसांत अघोषित भारनियमनाचे चटके ग्रामस्थ सहन करीत असून, परिसरातील अनेक ठिकाणी थेट मुख्य वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने कारवाई करणे गरजेचे आहे. तथापि, महावितरणचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असून, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठाही सुरळीत करण्याबाबत महावितरणचे कर्मचारी उदासीन आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
----------
शेकडोंची वीज जोडणी प्रलंबित
परिसरातील ग्रामस्थ वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने हैराण आहेत, तर शेकडो लोकांनी नव्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करून पैशांचा भरणाही केला आहे. त्यांना वीज जोडणी देण्याची तसदी महावितरण घेत नाही, तर दुसरीकडे चोरटे मात्र थेट तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करून महावितरणला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. या अजब प्रकारामुळे ग्रामस्थांकडून महावितरणच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परिसरातील शेकडो ग्राहकांनी नव्या वीज जोडणी