लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील २० ते २५ गावांतील पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतकºयांची प्रचंड गैरसोय होत आहे. किमान या पाणंद रस्त्यांवर मुरूम तरी टाकण्यात यावा, अशी मागणी वामन अवचार यांच्यासह शेतकºयांनी २० जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली.शेतकºयांना नेहमीच या ना त्या कारणामुळे विविध संकटांचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. त्यानंतरही रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपिट यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. २०२० मध्ये तर कोरोना विषाणू संसर्गामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने फळ उत्पादक, भाजीपालावर्गीय शेती करणाºया शेतकºयांना जबर फटका बसला.पावसाळ्यात शेतात जाताना किमान मजबूत पाणंद रस्ते असावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र, शेतकºयांची ही अपेक्षा या पावसाळ्यातही पूर्ण झाली नाही. तालुक्यातील २० ते २५ गावातील पाणंद रस्त्यांवर चिखल असल्याने शेतात जाताना शेतकºयांची कसरत होत आहे. पेरणीच्या हंगामात शेतात जाताना शेतकºयांची चांगलीच गैरसोय झाली. आताही शेती मशागतीच्या कामासाठी जाताना शेतकºयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. चिखलमय असलेल्या पाणंद रस्त्यांवर किमान मुरूम तरी टाकावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.
पाणंद रस्त्यांवर चिखल; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 5:28 PM