----------------
मालेगावातील नागरिकांच्या चाचण्या
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपंचायत व आरोग्य विभाग अलर्ट झाला असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस . यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत . या पृष्ठभूमीवर शहरातील व्यापारी व नागरिकांच्या चाचण्या घेण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे .
------------------
खताच्या दरामुळे शेतकरी संभ्रमात
वाशिम : एकीकडे अद्यापही जुन्या दराने खत मिळत नाही दुसरीकडे शासनातर्फे जुन्याच दरात खत मिळणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहे . तर अनेक शेतकऱ्यांनी खताची खरेदी करणे थांबविले आहे . तर जुन्या दराने खत मिळावे यासाठी प्रतीक्षा करीत आहे .
-------------
१५ गावात पाणी टंचाईच्या झळा
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५ गावांना सद्य स्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, १३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर ३ गावात टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाला त्यापैकी एका गावात टँकर सुरु झाले आहे.