वाशिम : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतमधील सफाई कामगार , कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दाेन दाेन महिने वेतन मिळत नसल्याने हाेत असलेल्या उपासमारीमुळे शासनाचे याकडे हाेत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १ मार्च राेजी ढाेल बजाव भीक मांगाे आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू बढेल यांनी दिली.
सदर विषयासंदर्भात अनेकवेळा संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आली आहेत. तसेच वेळाेवेळी आंदाेलनेही केलीत परंतु आयुक्त तथा संचालक कार्यालयाकडून मागील दाेन वर्षांपासून फक्त कागदी घाेडे नाचविले जात आहेत. शासनस्तरावर बरेच प्रश्न प्रलंबित असतांना त्याचा विचार केला जात नाही. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगाराची भीक मागावी लागत आहे. याकरिता कर्मचाऱ्यांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला असल्याचे जितू बढेल यांनी सांगितले.
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वेळेवर दरमहा १ तारखेपर्यंत अनुदान मिळत नाही. तसेच २०१९ मधील जानेवारी ते ऑक्टाेबरपर्यंतचे अनुदान अद्याप दिलेले नाही. त्यामुळे नगरपरिषदांना आता प्राप्त हाेणारे अनुदानातून मागील दाेन महिन्यापैकी एका महिन्याचा पगार देत आहेत. तसेच दरवर्षी १० टक्के वाढीसह अनुदान देणे अपेक्षित आहे परंतु मुळात पगार अनुदान वेळेवर येत नसल्याने व थकीत वेतनामुळे नगरपरिषद कर्मचारी यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने नगरपरिषदांच्या जकाती बंद करुन कर्मचारी यांना वेतन अनुदान देण्याचे कबूल केले आहे, परंतु या ऐवजी थेट काेषागारामार्फत कर्मचारी यांचे वेतन करण्यात यावे. सातव्या आयाेगातील अनुदान फरक देण्यात यावा यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.
...........
नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर शासनाच्यावतीने अन्याय हाेत असून हाेत असलेल्या अन्यायाबाबत प्रशासनाला कल्पना असावी, त्यांचे याकडे लक्ष वेधावे याकरिता आंदाेलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
जितू बढेल
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना , वाशिम