जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार हे पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी सकाळ पासुन संध्याकाळपर्यंत शहरातील संपुर्ण भाग पिंजुन काढत आहे.यामध्ये विना मास्क दिसणाऱ्या नागरिकांना, व्यापारी प्रतिष्ठाना वरील व्यावसायिक, कामगार यांना मास्क वापरण्याविषयी सुचना करीत असुन मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी शासनाने आखुन दिलेल्या कोरोना संदर्भातील नियमाचे पालन होते की नाही याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. या कामात पथकासोबत मुख्याधिकारी गणेश पांडे स्वतः जातीने लक्ष देऊन नागरिकांना मास्क तसेच सोशल डिस्टंस ठेवण्या संदर्भात सुचना करीत आहेत. गत दोन दोन दिवसात रिसोड शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. पालीका प्रशासन कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करण्यास सांगत आहे. यामध्ये सौम्य लक्ष आढळणाऱ्या कोरोना बाधीतांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगत आहे. तीन्ही पथकात नेमुन दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पालीका प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील सर्व मंगल कार्यालय व इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पन्नास पेक्षा अधिक नागरिक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच या कामात जे पालीका कर्मचारी कुचराई करतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी पांडे यांनी दिला आहे.
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पालीका ठेवणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:19 AM