प्राचार्य डॉ. विजयराव तुरुकमाने यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. किरण बुधवंत हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयराव तुरुकमाने यांनी कोरोना महामारीवर शासनाने कोरोना योद्ध्यांच्या माध्यमातून मिळविलेल्या यशाचे महत्त्व व्यक्त केले. उपस्थितांनी कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्वानुसार वर्तन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. किरण बुधवंत यांनी भारतातील कोरोना स्थितीचे विस्तृत विश्लेषण करून आपल्या कर्तव्याप्रती नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास नरवाडे यांनी तर आभार गजानन शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. कांताराम वाघाडे, प्रा. सुरेश जुंनघरे प्रा. ए. एन. बोंडे, प्रा संजय टिकार डॉ. ए. जी. वानखेडे, डॉ. जयंत मेश्राम, डॉ. मनोज नरवाडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात शासनाच्या कोविड-१९ च्या निर्देशांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात भित्तीचित्र स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:20 AM