लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शेतीच्या जुन्या वादावरुन काकडदाती ता.जि.वाशिम येथे २८ जुन २०१५ रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या राजु किसन राऊत या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर किसन मारोती राऊत या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी गुरुवारी सुनावली.वाशिम तालुक्यातील काकडदाती येथे २८ जुन २०१५ रोजी सदर घटना घडली होती.फिर्यादी गंगाबाई भारत सावंत वय ३५ वर्ष यांनी घटनेची फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पती भारत सावंत यांच्यासोबत वाशिमहुन बाजार करुन घरी जातांना गावातील किसन मारोती राऊत याने आपल्या घरासमोरुन का चालले असे हटकल्यावरुन आम्ही आमच्या शेतातुन जात आहोत असे म्हटले.यावर आरोपी किसन राऊत याने काठीने हातावर मारले तर त्याचा मुलगा राजु किसन राऊत याने आपले पती भारत सावंत यांच्या डोक्यावर कुºहाडीने वार करुन त्यांना गंभीररित्या जखमी केले. तसेच संजय किसन राऊत,विमल किसन राऊत व नेहा राजु राऊत यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली असे गंगाबाई सावंत यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. सदर घटनेत गंभीररित्या जखमी झालेले भारत सावंत यांना त्वरित वाशिम येथे व नंतर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथुन नागपुर येथे होप या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.उपचारादरम्यान ४ जुलै २०१५ रोजी भारत सावंत यांचा मृत्यु झाला.सदर प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार विनायक जाधव व पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ देशमुख यांनी आरोपी किसन राऊत ,राजु राऊत, विमल राऊत, संजय राऊत व नेहा राऊत यांच्याविरुध्द भादंवीचे कलम ३०२, १४७, १४८, ३२६, ५०४, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते.सदर प्रकरणी एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व प्रत्यक्ष दर्शी ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी आरोपी राजु राऊत यास कलम ३०२ मध्ये जन्मठेप व ५ हजार रुपये दंड दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास तसेच किसन राऊत यास कलम ३२३ मध्ये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्र्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पि.एस.ढोबळे यांनी बाजु मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेलगोटे यांनी सहकार्य केले.
खुन प्रकरणी काकडदाती येथील एकास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 7:15 PM
वाशिम - शेतीच्या जुन्या वादावरुन काकडदाती ता.जि.वाशिम येथे २८ जुन २०१५ रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात दोषी आढळुन आलेल्या राजु किसन राऊत या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर किसन मारोती राऊत या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश के.के.गौर यांनी गुरुवारी सुनावली.
ठळक मुद्देदुस-या आरोपीस एक वर्षाचा कारावासजिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकालशेतीच्या वादातुन घडले होते हत्याकांड