वाशिम: जुन्या वादातून एकास पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील नागरतास येथे गुरुवार २७ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. विजय केशवराव देवळे (४५) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार रेखा विजय देवळे (३६) रा.नागरतास हिने पोलीस स्टेशनला फियार्दी दिली की, तिचे पती विजय केशव देवळे (४५) आणि आरोपी विष्णू विठोबा देवळे यांच्यात १७ वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्या वादाच्या कारणावरुन आरोपी विष्णुचा काका आरोपी गजानन तुळशिराम देवळे हा फियार्दीच्या पतीस विष्णु सोबतचे वादावरून तसेच घराकडे वाकून का बघतो, असे कारण पुढे करून बरेच वेळा मारहाण करायाचा व रिपोर्ट दिला, तर जिवाने मारुन टाकीन अशी धमकी द्यायचा. गजानन देवळेचा गावात धाक असल्याने फिर्यादी व त्याची पत्नी गप्प राहायचे. अशात २७ आॅगस्ट रोजी रात्री फिर्यादीचा पती मृतक विजय देवळे हा भाजी आणण्यासाठी त्याचे वडिलांच्या घरी गेला. त्यानंतर ११:३० वाजता फिर्यादीस तिच्या पतीचा जोराजोरात ओरडण्याचा ऐकू आवाज आला. त्यावरून फिर्यादीने जाऊन पाहिले असता आरोपी गजानन तुळशीराम देवळे. शुभम गजानन देवळे, पवन गजानन देवळे, रोशन महादेव देवळे, पुरुषोत्तम बळीराम काळे, महादेव विठोबा देवळे, आदिंनी फिर्यादीचा पती विजय केशव देवळे यास लोखंडी पाईप व लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसले, तसेच गजानन देवळे यांनी विजयचे वडील तथा फिर्यादीच्या सासऱ्यास बोलावून घेतले. तेव्हा फिर्यादी व तिचे सासºयाने आरोपींना विजयला मारू मारू नका, असे म्हणून विनंती केली परंतु त्यांनतरही आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली आणि त्याला त्याच्या घरासमोर आणून टाकले. आई, वडील आणि पत्नीने जखमी विजयचे कपडे काढून पाहिले असता त्याच्या डोक्यावर, हाता पायावर, पाठीवर, पोटावर मार लागल्याचे व त्याचा उजवा पाय मोडल्याचे दिसून आले. त्याला दवाखाण्यात नेण्यास गाडी मिळाली नाही. अखेर गंभीर जखमी असल्यामुळे त्याचा विजयचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींवर कलम ३०२, १४३, १४७, १४८. १४९, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल कारून त्यांना अटक करण्यात आली