वाशिम : अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मृतक आशिता सोनकांबळे (रा. बोधन जि. निजामाबाद, तेलंगणा) हिचे वडिल राजाराम सोनकांबळे यांनी सोमवार, १0 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असणार्या आशिता सोनकांबळे या मुलीचा मृतदेह ५ एप्रिल रोजी संदेहास्पद स्थितीत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. या प्रकरणी मृतक आशिताचे वडिल राजाराम सोनकांबळे यांनी संशय व्यक्त करुन, त्यांच्या मुलीची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. मृत्यूपुर्वी आशिताने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल आपणास फोनवर कळविले होते. घनश्याम जोगदंडसह महाविद्यालयाचा प्राचार्य माझ्याकडे शरिरसुखाची मागणी करित होते. यासाठी प्रदिप, श्रीपाल, श्रीशा आणि रेश्मा हे विद्यार्थी प्रोत्साहित करित होते, असा खळबळजनक आरोप राजाराम सोनकांबळे यांनी केला. संस्थाचालक अविनाश जोगदंड हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करित आहेत, महाविद्यालयीन प्रशासनाने या प्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, आशिताजवळ असलेले दोन्ही मोबाईल नष्ट करण्यात आले, तीच्यावर झालेले अत्याचार तीने एका डायरीत लिहून ठेवले, ती डायरी देखील गहाळ करण्यात आली, असेही राजाराम सोनकांबळे यांचे म्हणणे आहे. आशिताच्या गळ्याला जाड आणि मोठय़ा स्वरूपाच्या धारदार शस्त्राने चार ते पाच इंच लांब व दोन ते अडीच इंच खोल वार केल्याने तीचा गळा पूर्णत: चिरला होता. मात्र. शरिरशास्त्रानुसार स्वत:च्या हाताने स्वत:वर इतका खोल वार करणे शक्य नाही. मात्र, मारेकरूंनी दिशाभूल करण्यासाठी प्रथम आशिताचा गळा कापून नंतर तीचा डावा हात कापला आणि ही आत्महत्याच असल्याचे भासविण्यात आले, असा आरोप राजाराम सोनकांबळे यांनी केला आहे.आशिता सोनकांबळे आत्महत्येप्रकरणी आकस्मिक दाखल करण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा, मृतदेहाची उत्तरीय तपासणीसह महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे बयाणही नोंदविण्यात आले आहे. मृतीकेच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या दिशेनेही तपास केला जाईल. दोषींवर कारवाईत कुठलीच हयगय केली जाणार नाही.-आर.जी.शेख,ठाणेदार, जऊळका पोलिस स्टेशनआशिता सोनकांबळे ही विद्यार्थीनी मानसिक रोगी होती. त्यानुसार, तीच्यावर उपचार देखील सुरू होते. यासंदर्भात तीच्या पालकांनाही कल्पना होती. त्यातूनच तीने अंगावर ब्लेडने घाव करून आत्महत्या केली असावी. यात महाविद्यालयीन प्रशासनाचा कुठलाही दोष नाही.- अविनाश जोगदंडसंस्थाचालक, कृषी महाविद्यालय, आमखेडा
माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच!
By admin | Published: April 11, 2017 2:13 AM