शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

‘नाफेड’चे धनादेश होताहेत ‘बाऊन्स’!

By admin | Published: May 26, 2017 1:57 AM

खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक विवंचनेत : पैशांअभावी खोळंबली शेतीची कामे

शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घे:न ‘नाफेड’मार्फत प्रत्यक्षात तूर खरेदी करण्यात आली; मात्र यासाठी ‘नाफेड’ने नेमलेल्या संस्थांकडून शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी दिले जाणारे धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देऊन चक्क ‘बाऊन्स’ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने ‘नाफेड’च्या खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर निधीअभावी उधारीवरच तूर खरेदी सुरू आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धनादेश तुरीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. असे असताना ‘नाफेड’कडून यासाठी नेमण्यात आलेल्या ठराविक संस्थांकडून शेतकऱ्यांना धनादेश दिल्यानंतर संबंधित खात्यात निधीची कमी असल्याचे कारण समोर करून शेतकऱ्यांचे धनादेश ‘बाऊन्स’ होत असल्याने शेतकऱ्यांना चुकारे मिळणे कठीण झाले आहे. केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून त्यांच्या शेतमालाची रक्कम रोखऐवजी धनादेशाव्दारे मिळू लागली. चलन तुटवड्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेशसुद्धा बँकांमध्ये न वटता अनादरीत होत होते. आता नाफेडचेही चेक बाऊन्स होत असल्यामुळे नेमके काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने नाफेडमार्फत हमीदरात तूर खरेदीचा निर्णय घेतला; परंतु शासकीय तूर खरेदी शेतकऱ्यांसाठी फायद्याऐवजी तोटा देणारी ठरत आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य वेळी चुकारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाळ्याची चाहूल लागलेली असताना शेतजमीन तयार करण्यासाठी तसेच पेरणीसाठी पैसा कोठून आणावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेच्या खात्यात रक्कमच नाही!अनसिंग येथील पांडुरंग ठाकरे अध्यक्ष असलेल्या विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेच्या खात्यात रक्कमच नसल्यामुळे संस्थेमार्फत शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाऱ्यापोटी दिले जाणारे धनादेश ‘बाऊन्स’ होत आहेत. यात जांभरूण महाली येथील केशव गणपत महाले या कास्तकाराचा ७६ हजार ६९० रुपयांचा धनादेश, भगवान निंबाजी शेळके यांचा ५५ हजार ४४९ रुपयांचा धनादेश; तर दिनकर भगवान शेळके यांचा १ लाख २६ हजार २५० रुपयांचा धनादेश ‘बाऊन्स’ झाला असून, इतरही अनेक शेतकरी या समस्येमुळे बहुतांशी आर्थिक संकटात सापडले आहेत. ‘नाफेड’ आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून तुरीच्या मालाचे पैसे वेळेत कसे मिळतील, याची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. नाफेड केंद्रावर आपण तूर विकली असून, ८ मे २०१७ या तारखेचा ७६ हजार ६९० रुपयांचा धनादेश (क्रमांक ३६५८५) सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा मिळाला आहे. सदर धनादेश ११ मे व २३ मे या तारखांना ‘अ‍ॅक्सीस’ बँकेत वटविण्यासाठी खात्यात जमा केला होता; मात्र दोन्ही वेळेला खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश वटविल्या गेला नाही. त्यामुळे आपणावर आर्थिक संकट कोसळले असून, व्यवहार कसा करावा, तसेच शेतीची मशागत व पेरणीची व्यवस्था कशी लावावी, हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा ठाकला आहे.- केशव गणपत महालेक ास्तकार, जांभरुण महालीनाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या कास्तकारांना देण्यात आलेले धनादेश बँकेत अनादर झाल्याचा प्रकार आपणास माहीत झाला आहे. याबाबत चौकशी करुन संबंधित कास्तकारांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.- पांडुरंग ठाकरे अध्यक्ष, विदर्भ कृ षी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्था, अनसिंग नाफेड केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीमार्फत मोबदला धनादेशाद्वारे दिला जात आहे. नाफेडकडून दिली जाणारी रक्कम सोसायट्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे धनादेश अनादर होणे अशक्य आहे, असा प्रकार घडला असेल तर याबाबत चौकशी केली जाईल. - मनोज बाजपेयीजिल्हा मार्केटिंग अधिकारी, ‘नाफेड’