शासनाने हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत शेतमालाची खरेदी करण्यासाठी संत गजानन महाराज नावीन्यपूर्ण कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, उमरा कापसे या संस्थेला सबएजंट म्हणून नियुक्त केले आहे. वाशिम व रिसोड तालुक्यांतील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या हरभरा मालाची ऑनलाईन नोंदणीकरिता हंगाम २०२०-२१ मध्ये हरभरा पिकाची नोंदणी असलेल्या तलाठ्याकडून घेतलेला सातबारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबर नोंदणी करताना द्यावा. वाशिम तालुक्यातील शेतकरी बांधवांनी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील दुकान क्रमांक ७८ मधील संस्थेच्या कार्यालयात व रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी निवासमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नत्थुजी कापसे यांनी केले आहे.
‘नाफेड’ करणार हमीदराने हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:35 AM