लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नाफेड तूर खरेदी केंद्रांतर्गत वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने १५ मे पर्यंंत ६ हजार २00 शेतकर्यांना तसेच अनसिंग उपबाजार समितीमार्फत १ हजार ६६२ शेतकर्यांना तूर खरेदीचे टोकन दिले; मात्र त्यापैकी केवळ ५६२ शेतकर्यांची ७ हजार ८00 क्विंटल तूर मोजणी झाली आहे. निर्धारित मुदतीत ३१ मे पर्यंंत उर्वरित तूर मोजून घेणे अशक्य असल्याने ही मुदत वाढवून मिळणे आवश्यक आहे. याबाबत शासन-प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती वाशिम बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा उपनिबंधक व नाफेडच्या जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांच्या पत्रानुसार वाशिम कृषी बाजार समितीने मुख्य यार्डातून ६ हजार २00; तर अनसिंग उपबाजारातून १ हजार ६६२ अशा एकूण ७ हजार ८00 कास्तकारांना टोकन देण्यात आले. त्यापैकी आजपर्यंंत ५६२ कास्तकारांचाच माल मोजण्यात आला. ३१ मे पर्यंंत अजून १ हजारापेक्षा अधिक टोकनसाठी नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी झालेला माल निर्धारित मुदतीत कुठल्याच परिस्थितीत मोजणे अशक्य असल्यामुळे ३१ मे ला नाफेड तूर खरेदी केंद्र बंद न करता पुढेही सुरु ठेवून शासनाने कास्तकारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याचेही सभापती गोटे यांनी सांगितले. यावेळी उपसभापती सुरेश मापारी, सचिव बबन इंगळे, संचालक राजू चौधरी, प्रभाकर लांडकर, दामुअण्णा गोटे, सुरेश लाहोटी, हिरा जानिवाले, केशव मापारी, रामेश्वर काटेकर, बापूराव उगले, मीनाक्षी पट्टेबहादूर आदी संचालक उपस्थित होते.
‘नाफेड’च्या तूर खरेदीस मुदतवाढ मिळणे आवश्यक!
By admin | Published: May 28, 2017 4:06 AM