वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. मंगरुळपीर येथे सर्वच राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँके च्या शाखाही बीएसएनएलच्या सर्व्हरशी जोडल्या आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत. त्यातही स्टेट बँकेच्या इतर ठिकाणच्या शाखांतही ही अडचण नाही. त्यामुळे स्टेट बँके च्या मंगरुळपीर येथील शाखेसाठी बीएसएनएलचे स्वतंत्र सर्व्हर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलशी जोडले असलेल्या कार्यालयांचे कामकाजही सुरळीत सुरू आहेत. मग मंगरुळपीर स्टेट बँकेच्या व्यवहारांनाच अडथळा कसा निर्माण झाला, हे न उलगडणारे कोडे आहे. कारण कोणतेही असले तरी, व्यवहार बंद असल्यामुळे येथे दरदिवशी येणारे हजारांवर ग्राहक, खातेदार प्रचंड अडचणीत सापडले असून, त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नही केले जात नसल्याचे दिसत आहे. कनेक्टीव्हिटीचा अभाव असेल, तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, असा प्रश्न ग्राहकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय सर्व्हर कनेक्टीव्हिटी नाही, असा फलक कोठेही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना माहितीच होत नसल्याने त्यांच्या येरझारा मात्र सुरूच आहेत. पण, कनेक्टीव्हीटी नसल्याचे सांगून बँक व्यवहार रोखणे आणि त्यासाठी सर्व ग्राहकांना वेठीस धरणे ही फार मोठी फसवणूक आहे. जर कनक्टीव्हीटी नाही तर तो प्रश्न प्रश्न तात्काळ सोडविणे आवश्यक होते. तसे वरीष्ठ पातळीवर कळविणे व वरिष्ठ पातळीवरून संबंधित तज्ञ, तंत्रज्ञ, वा इतर यांना पाठवून अडचण दूर करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. पण, तसे काहीही दिसले नाही. -निलेश मिसाळ, खातेदार ग्राहक, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा, मंगरुळपीर
कनेक्टीव्हिटी नसल्याच्या नावाखाली मंगरुळपीर स्टेट बँकेतील व्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:52 PM
वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देमागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत.