मालेगाव: शहरातील कुटूंबांकडे विविध सेवांबाबतचा कोट्यवधींचा कर थकित असून, ही थकबाकी वसुल करण्यासाठी नगर पंचायतच्यावतीने मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत असून, त्याची पर्वा न करणाºया नागरिकांची नावे श्हरात विविध ठिकाणी फलक लावून जाहीर करण्याचेही नगर पंचायत प्रशासनाने ठरविले आहे. नगर पंचयातच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक लोक कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच नगर पंचायतने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत थकबाकीदारांची नावे विविध चौकांत फलकाद्वारे प्रसिद्ध करण्याचेही नगरपंचायतने ठरविले आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. सद्यस्थितीत मालेगाव नगर पंचायत क्षेत्रांतर्गंत येत असलेल्या शासकीय- निमशासकीय कार्यालय व घरगुती कर थकबाकीचा आकडा १ कोटी रुपयांच्या घरात आहे. मुख्याधिकारी गणेश पांडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरिक्षक मनोज सरदार यांच्या पुढाकारात कर विभाग या थकबाकीच्या वसुलीसाठी परिश्रम घेत आहे. करवसुली दरम्यान या अधिकारी, कर्मचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने काही जणांनी कराचा भरणा केला तर काही जण प्रतीक्षा करतांना दिसून येत आहेत. यासाठी मालेगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांनी कर भरणा न करणाºया नागरिकांची नावे फ्लेक्स द्वारे जाहिर करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर नगर पंचायतच्या नियम १९६५चे कलम १५२ ते १५६ अंतर्गत पोलीस कारवाई करुन घरातील साहित्य जप्त केल्या जाणार आहे. या कारवाईमुळे अनेक नागरिकांनी धास्ती घेतली आहे. ज्यांना या मोहिमेची कल्पना झाली ते थकीतदार करविभागात जाऊन आपल्या कराची माहिती घेत भरणा करतानाही दिसत आहेत. नगर पंचायतची कर वसुली १०० टक्के व्हावी यासाठी मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरिक्षक मनोज सरदार, संतोष बनसोड, बाबु राऊत, अवि काटेकर, विठ्ठल चोपडे, इरफान सैयद आदि परिश्रम घेत आहेत.
मालमत्ता आणि इतर सुविधांपोटी आकारण्यात येणाºया कराचा भरणा वेळेत न करणाºया मालमत्ताधारकांची नावे विविध चौकांत फलकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत. ही नामुष्की टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून नगर पचांयत प्रशासनाला सहकार्य करावे. कराचे मागणी पत्र न मिळाल्यास नगर पंचायत मधून संपर्क साधून ते मिळवावे.
-गणेश पांडे मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव