रिसोड तालुक्यामध्ये मतदार यादी फोटोसह पुनरिक्षण कार्यक्रम सुरु झाला आहे . ०३३ रिसोड विधानसभा मतदार संघ अंतर्गत रिसोड तालुक्यात एकुण १७३ मतदान केंद्राच्या यादीत ३४७१ मतदाराचे मतदान यादीत छायाचित्र नाही . यांच्या बाबतीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. तलाठी यांच्यामार्फत गृह भेटीदरम्यान सदर फोटो नसलेले मतदार तिथे राहात नसल्याचे समोर आले आहे . त्यांची नावे कटाक्षाने वगळली जाईल . मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे , यासाठी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करुन तहसिल कार्यालयात जाऊन यादी पाहावी व ज्यांच्या नावापुढे छायाचित्रे नाही अशा मतदारांनी २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपल्या फोटोमागे नाव लिहून आपल्या गावातील, भागातील बीएलओ अथवा तहसिल कार्यालय रिसोड येथील निवडणूक विभागात जमा करावे , असे आवाहन तहसिलदार रिसोड तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी अजित शेलार , नायब तहसिलदार लक्ष्मण बनसोडे व महसूल सहायक संदीप काळबांडे यांनी केले आहे .
मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची नावे वगळली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:32 AM