लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथून जवळच असलेल्या पार्डी टकमोर येथील चंद्रकुमार केशरचंद टिकाईत या ५७ वर्षीय शेतकर्याचा नापिकी व कर्जाच्या धास्तीने सोमवारी सायंकाळी शेतातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्ज तसेच मुलीच्या लग्नासाठी नातेवाइकांकडून घेतलेली उसनवारी आणि यावर्षीची नापिकी या चिंतेतून चंद्रकुमार यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि पत्नीसमोरच त्यांनी प्राण सोडला.पार्डी टकमोर येथील चंद्रकुमार टिकाईत यांच्याकडे तीन एकर शेती असून, यावर्षी या शेतात सोयाबीन व तूर पेरले आहे. सोमवारी पत्नी साधना यांच्यासोबत ते शेतात गेले होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शेतातच त्यांच्या छातीमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. काही कळायच्या आतच त्यांनी पत्नीसमोर प्राण सोडला. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांनी शेतातील नापिकी पाहून पत्नीकडे चिंता व्यक्त केली होती. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्ज तसेच मागील वर्षी लहान मुलीच्या लग्नात नातेवाइकांकडून घेतलेली उसनवारीची रक्कम कशी फेडावी, तीन ते चार लाख रुपयांच्या रकमेची व्यवस्था कुठून करावी, याबाबत त्यांनी पत्नीशी चर्चा केली होती. सायंकाळच्या सुमारास चंद्रकुमार यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती मृतकाचे मावसभाऊ अरुण गोरे रा. तोरणाळा यांनी मंगळवारी ‘लोकम त’ला दिली. चंद्रकुमार टिकाईत यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे शेतात अचानक मृत्यू झाल्याच्या घटनेने पार्डी टकमोर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
नापिकी, कर्जाच्या धास्तीने शेतकर्याचा शेतातच मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:16 AM
वाशिम : येथून जवळच असलेल्या पार्डी टकमोर येथील चंद्रकुमार केशरचंद टिकाईत या ५७ वर्षीय शेतकर्याचा नापिकी व कर्जाच्या धास्तीने सोमवारी सायंकाळी शेतातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
ठळक मुद्देपार्डी टकमोर येथील घटना