लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - पाणीटंचाईग्रस्त गावांत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ६५ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजना करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता, हे विशेष.जिल्ह्यातील काही गावांत उन्हाळ्याला सुरूवात झाली की पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. तेथे तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना केल्या जातात. कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पेयजल योजनेत या गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला होता. याबाबत मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. यामुळे आता जिल्ह्यातील ६५ गावांचा समावेश या योजनेत झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी बुधवारी दिली. कारंजा तालुक्यातील २०, मालेगाव तालुक्यातील ८, मंगरूळपीर ८, मानोरा ८, रिसोड ९ व वाशिम तालुक्यातील १२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या योजनेची काही कामे ही जिल्हा परिषदेमार्फत तर काही कामे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केली जाणार आहेत. ६५ गावांतील या योजनेसाठी ६५ कोटी ५१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी यासाठी मंजूर झालेला आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेत ६५ गावांचा समावेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 8:03 PM
वाशिम - पाणीटंचाईग्रस्त गावांत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ६५ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजना करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे जिल्ह्यात ६५ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजना करण्यात आला आहेआमदार राजेंद्र पाटणी यांनी केला पाठपुरावा योजनेची काही कामे ही जिल्हा परिषदेमार्फत तर काही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केली जाणार