आधार नोंदणी होतेय पूर्ववत
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधार नोंदणी केंद्र मध्यंतरी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाली होती. आता पूर्ववत हाेताना दिसून येत आहे.
वीजबिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
वाशिम : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क, तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या कारभाराने वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
किसान सन्मान निधीची प्रतीक्षा
वाशिम : संपूर्ण देशभरात ‘ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ राबविली जात आहे ; परंतु चिखली, कवठा, किनखेडा, व्याड परिसरातील काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे
जहाल कीटकनाशकांचा वापर टाळावा
वाशिम : शेतकऱ्यांनी जहाल कीटकनाशकांचा वापर टाळावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी विकास बंडगर व कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी केले