...............
प्रवाशांनी मास्क वापरण्याचे आवाहन
वाशिम : एस.टी.ने प्रवास करणाºया प्रवाशांनी तोंडाला सदोदित मास्क किंवा रुमालचा वापर करावा, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. एस.टी.च्या वाहकांकडूनही प्रवासादरम्यान सातत्याने यासंबंधीच्या सूचना दिल्या जात आहेत, अशी माहिती आगारप्रमुख विनोद इलामे यांनी दिली.
...............
मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन
वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ४८ गावांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, बालक व इतर रुग्णांची मोफत तपासणी व औषध वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार, मंगरूळपीर तालुक्यातील नांदखेडा, तांदळी, बोरव्हा, लखमापूर येथे २४ मार्च रुग्ण तपासणी केली जाणार आहे.
..............
ग्रामीण भागात धुरमुक्त अभियानाला खीळ
जऊळका रेल्वे : एलपीजी गॅस-सिलींडरच्या किंमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट विस्कळित झाले आहे. यासह उज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद केल्याने धुरमुक्त अभियानाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
.............
मेडशी परिसरात अवैध रेती वाहतुक
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून अवैधरित्या रेतीची वाहतुक होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी युवकांनी तहसीलदारांकडे मंगळवारी निवेदनाव्दारे केली आहे.
...........
आॅनलाईन शिक्षणात इंटरनेटचा खोडा
किन्हीराजा : आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी अॅन्ड्रॉईड मोबाईलची गरज आहे. तो विकत घेण्यासाठी ऐपत नसतानाही अनेकांनी पदरमोड करून मोबाईल विकत घेतला आणि त्यात सिमकार्ड घालून शिक्षण सुरू झाले; मात्र वारंवार नेटवर्क जाणे, गती न मिळणे यासह अन्य अडचणींमुळे आॅनलाईन शिक्षणाचा पुरता बोजवारा उडत आहे.
...............................
शिरपूरातील महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा
वाशिम : गतवर्षी कोरोना संकट उद्भवण्यापुर्वी बचतगटातील महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळाल्या; मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. मध्यंतरी पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. असे असताना आता महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.
...............
बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
वाशिम : जिल्ह्यात यावर्षी २६ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा निधीदेखिल प्राप्त झाला असून काहीठिकाणचे बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होऊन त्याचा वापर सुरू झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.
..............
अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपुर्वी नुतनीकरण झाले; मात्र अल्पावधीतच रस्ते खराब होऊन दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
.............
वनविभागाच्या जमिनीवर अतीक्रमण
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतीक्रमण झाले असून काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतीक्रमण हटवावे, अशी मागणी वृक्षप्रेमी माधवराव मारशेटवार यांनी मंगळवारी केली.
.............
आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, २४ मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.............
महामार्गावरील वाहतुक जागीच ठप्प
वाशिम : शहरातील पोस्टआॅफीस चौक, हिंगोली नाका, पुसद नाका याठिकाणाहून गेलेल्या महामार्गावरील वाहतुक बुधवारी दुपारच्या सुमारास विस्कळित झाली होती. वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.
.............
सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्त्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नाही. काही कार्यालयांचा अपवाद वगळल्यास बहुतांश कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
...............
कठोर नियमामुळे थुंकण्यावर नियंत्रण
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला आळा बसावा, यासाठी दुकाने, पानटपºया सायंकाळी ५ वाजेनंतर बंद ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. यामुळे खर्रा, पुड्यांची विक्री घटली असून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.
.............
रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : शहरातून रिसोडकडे जाणाºया लाखाळापर्यंतच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे दुभाजक उभारण्यात यावे. यामुळे वाहतूक सुरळित राहण्यास मदत होईल, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते संदिप चिखलकर यांनी सोमवारी बांधकाम विभागाकडे केली.