वाशिम: कठुआ व उन्नाव येथील बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १७ एप्रिल रोजी निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम , मंगरुळपीर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले की, कठूआ व उन्नाव येथील पिडीत बालीकेवर अन्याय करुन हत्या करणाºया आरोपिंना तात्काळ फाशी देण्यात यावी. तसेच मोदी सरकार जातीवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारचा तिव्र निषेधही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली ठाकुर, बबलू अहिर, बाबुराव काळबांडे, गजानन गोटे, संतोष मापारी, सै. जावेद, विजयकुमार सोमाणी, काशिराम रामचंद्र मुठाळ, राजेंद्र गंगवाल, मो. नजरुद्दीन खतिब, रामदास विठ्ठल ठाकरे, गजानन जटाळे, सय्यद जावेद, घाशिराम हरसिंग राठोड, महादेव भोयर, अजय भोयर, विलास रोकडे, जनार्धन सोनुने, गोविंद वर्मा, शांता शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली होती.