लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने बुधवारी केले. ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार आहे.आता धार्मिक सण, उत्सव सुरू होत असून, विज दराचा अधिक भार भाविकांसह दुर्गोत्सव मंडळावर पडू नये म्हणून सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी दिली जाणार आहे. कोणत्याही सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे अधिक १ रुपया २१ पैसे वहन (व्हिलींग) आकार व इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १० पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९९ पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, असे आवाहन महावितरणने केले.दक्षता घेण्याचे आवाहनसार्वजनिक दुर्गोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घ्यावी तसेच वायरिंगसाठी वापरण्यात येणारे ‘वायर’ हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने ‘वायर’चा उपयोग जपून करावा असे आवाहन महावितरणने केले. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा दुर्गोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे तसेच वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक असल्याचा दावा महावितरणने केला आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक मंडळांनी वीजसुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले.
नवदुर्गा मंडळांना मिळणार सवलतीचा वीजदर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:58 PM
वाशिम - सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी मिळणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने बुधवारी केले. ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार आहे.
ठळक मुद्देविज दराचा अधिक भार पडू नये म्हणून सार्वजनिक नवदुर्गा मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी . ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट असा दर राहणार