वाशिम, दि.२ - थकीत वीज देयकांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ह्यनवप्रकाशह्ण योजनेला ३१ जुलै २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मुदतवाढ मिळालेल्या ह्यनवप्रकाशह्ण योजनेनुसार आता येत्या ३0 एप्रिल २0१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १00 टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. याआधी ही मुदत ३१ जानेवारी होती. मात्र, त्यास आता मुदतवाढ मिळाली असून, १ मे २0१७ ते ३१ जुलै २0१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व १00 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.या योजनेत ३१ मार्च २0१६ पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीज ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे.मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ह्यऑनलाइनह्ण सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे. ही रक्कम धनादेशद्वारेही भरता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडळ कार्यालयात नवप्रकाश योजनेत सहभागी होणार्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
‘नवप्रकाश’ला पाच महिने मुदतवाढ!
By admin | Published: March 03, 2017 12:44 AM