मालेगाव : रिसोड मतदारसंघावर डोळा ठेवून राष्ट्रवादी कॉग्रेसने सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे मित्रपक्ष असलेल्या कॉग्रेसचे ब्लडप्रेशर वाढायला सुरूवात झाली आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर असलेल्या या मतदार संघावर सद्या राष्ट्रवादी कॉग्रेससने दावा केला आहे. एवढेच नव्हेतर मतदार संघात विविध कार्यक्रम, मेळावे घेऊन वातावरण निर्मितीही चालविली आहे. आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेससाठी न सुटल्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नेते येथे बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, आघाडीत बिघाडी येवू पाहत असुन या निमित्ताने पून्हा एकदा राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात निवडणूक होऊ घातली आहे. परिणामी राजकीय वातावरण तापायला प्रारंभ झाला आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रस व पिपिल्स रिपब्लिीकन पक्षाच्या आघाडीत रिसोड व वाशिम हे दोन मतदार संघ कॉग्रेसच्या तर कारंजा हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आहे. यापैकी रिसोड मतदार संघावर अचानक राष्ट्रवादी कॉग्रेसने दावा केला आहे. या मतदार संघात समाविष्ट असलेल्या मालेगाव व रिसोड तालुक्यात पक्षाचे चांगले नेटवर्क असल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी कॉग्रेससाठी सोडण्यात यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रैष्ठीकडे केली आहे. यानुसार प्रदेश कार्यकारिणीने वाढीव मतदार संघांमध्ये रिसोड राष्ट्रवादी कॉग्रेससाठी सोडण्यात यावा अशी मागणी कॉग्रेसकडे केली आहे. कॉग्रेस मात्र राष्ट्रवादीचा हा दावा मानायला तयार नाही. गत एप्रिल महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत मोदीच्या लाटेतही कॉग्रेसने या मतदार संघात विजयश्री खेचून आणला होता. त्यामुळे मतदार संघात येणार्या मालेगाव व रिसोड या दोन्ही तालुक्यात कॉग्रेस पक्षाचे संघटन मजबुत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कॉग्रेसचा बोलबाला आहे. सन १९९९ व सन २00४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचा अपवाद वगळल्यास या मतदार संघाने कॉग्रेसलसाच बळ दिले असल्याचा इतिहास आहे.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यांनी वाढविले कॉग्रेसचे ‘ब्लडप्रेशर’
By admin | Published: September 18, 2014 1:13 AM