वाशिम : अगोदरच यापूर्वीच्या लाॅकडाऊनमुळे कंबरडे मोडले असून आता पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या ब्रेक द चेनची अंमलबजावणी करताना गळ्यातील चेन मोडायची वेळ आली असल्याची खंत व्यावसायिकांसह गृहिणींनी व्यक्त केली आहे.
शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये मेडिकल, किराणा, दूध डेअरी यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, स्टील भांड्याची दुकाने, कापड, जनरल स्टोअर्स, टेलरिंग व्यवसायिक, सलून, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मोबाइल, फोटो स्टुडिओ, झेरॉक्स, सराफा, फुटवेयर, चहा कॅन्टिन आदी दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. यामुळे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
००००
तीन महिनेच सुरू राहिला व्यवसाय
जिल्ह्यात केवळ तीन महिनेच व्यवसाय सुरू राहिला. त्यातही नेहमीप्रमाणे उत्पन्न झाले नाही. कोरोनाचे रुग्ण कधी-अधिक प्रमाणात असल्यामुळे ग्राहक बाहेर फारसे फिरकलेच नाहीत. त्यामुळे गतर्षीचे कर्ज फेडणेही शक्य झाले नाही, तर आता पुन्हा मिनी लाॅकडाऊन लागला असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. शासनाने लाॅकडाऊन रद्द करायला हवा.
००००००
गतवर्षातही कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने व्यापारी, व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातील लोकांचे कंबरडे मोडले आहे. या धक्क्यातून सावरतानाच ही दुसरी लाट येत आहे. सलूनची दुकाने बंद असल्याने घर चालवताना अनेक अडचणी येत आहेत. कुटुुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या इच्छा पूर्ण करता येत नाही. - स्नेहल पवन कणखर गृहिणी.
0000
०००
काेरोनामुळे गतवर्षी सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच परिस्थिती बिघडली आहे. घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुकाने बंद राहिल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न आहे.
- प्रियंका धाबे, गृहिणी.
0000
९०
दिवस सुरू राहिलेली दुकाने