लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाणी फाऊंडेशनकडून जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ३४ आणि मंगरूळपीर तालुक्यातील १९ अशा एकंदरित ५३ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. दरम्यान, गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून अधिकारी, पदाधिकाºयांनीही प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवार, २ मार्च रोजी पार पडलेल्या अधिकारी, पदाधिकाºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार, तालुका कृषी अधिकारी वाळके, कांबळे, कारंजाचे गटविकास अधिकारी तापी, वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी, मुनेश्वर, उमेद प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक खुजे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत समाविष्ट सर्वच गावांमधील प्रत्येकी पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत संबंधित त्या-त्या ठिकाणच्या अधिकारी, पदाधिकाºयांनीही जाऊन प्रशिक्षण घ्यावे. तेव्हाच खºयाअर्थाने गाव समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न होतील, असे हिंगे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांसह मी देखील प्रशिक्षणास आवर्जून जाणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिली. स्पर्धेचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे यांनी केले; तर तालुका समन्वयक सुभाष गवई यांनी आभार मानले
गावांच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - शैलेश हिंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:27 PM