शिरपूर येथे ८ मार्चपासून कोरोना लसीकरण आला सुरुवात करण्यात आली आहे. येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आतापर्यंत जवळपास पाच हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये ४४०० जणांना कोव्हॅक्सिनचा डोस तर ७०० जणांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. काही दिवसापासून दुसरा डोससुद्धा देणे सुरू झाले आहे. मात्र, दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनची गरज असताना शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. बुधवारी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राला ३०० कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला. ज्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला, त्यांना ८४ दिवस पूर्ण न झाल्याने दुसरा डोस नवीन नियमानुसार देता येत नाही. एकंदरित कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन मुदत संपत असूनही दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात उपलब्ध होईना, असा प्रकार सुरू असल्याने लसीकरण प्रक्रिया रखडली आहे.
.................
बॉक्स..... आरोग्य विभागाने कोणत्या लसीकरण केंद्रावर पहिला डोस अधिक प्रमाणात देण्यात आला. यांची तंतोतंत माहिती ठेऊन त्या प्रमाणात लस पुरवठा करायला पाहिजे. शिरपूर येथे पहिला डोस मोठ्या प्रमाणात कोव्हॅक्सिनचा देण्यात आला आणि आता पुरवठा कोविशिल्डचा करण्यात येत आहे. हे विसंगत आहे.