- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या सिंचन प्रकल्पांची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील विविध प्रकल्पांचे बळकटीकरण आणि आवश्यक दुरुस्तीच्या १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता जिल्हा पठारावर वसलेला असल्यामुळे अस्त्विात असलेल्या प्रकल्पांव्यतिरिक्त नविन लघू, मध्यम वा मोठे प्रकल्प उभारण्यास वाव कमी आहे. त्यामुळे पूर्वी अस्तिवात असलेल्या प्रकल्प, योजनांची दुरुस्ती करून, त्यांचे बळकटीकरण करून पाणीसाठा व सिंचन क्षमता पुनरुजिव्वीत करणे आवश्यक आहे. त्यातच कुठे प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, कुठे भिंतीवर वाढलेले जंगल, तसेच इतर कारणांमुळे शेतकºयांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी यापूर्वीही जि. प. जलसंधारण विभागाने प्रस्ताव तयार केला होता; परंतु अपुºया निधीमुळे कामे करता येऊ शकली नाहीत. आता विविध प्रकल्पांचे बळकटीकरण व विशेष दुरुस्तीसह इतर मिळून १२८ कामांसाठी जि.प. जलसंधारण विभागाने २८ फेब्रुवारी रोजी नव्याने २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. यात प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीच्या ७५ कामांसाठी १३ कोटी १ लाख ५५ हजार झाडाझुडपे छाटणीसह इतर दुरुस्तीच्या २१ कामांसाठी ७४ लाख, सिंचन तलावाच्या वितरण प्रणालीचे बळकटीकरण करण्याच्या ७ कामांसाठी ८ कोटी ७४ लाख, तर साखळी, सिमेंट बंधारच्या २५ कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.पालकमंत्र्यांसह जि.प. अध्यक्षांकडे प्रस्ताव सादरजिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी लागणाºया २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव जि.प. जलसंधारण विभागाच्यावतीने अमरावती विभागाच्या प्रादेशिक जलसंधारण अधिकाºयांसह जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेयांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी प्राप्त होताच ही कामे सुरू होणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रादेशिक जलसंधारण अधिकाºयांसह पालकमंत्री व जि. प. अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे.-ए. एम. खान,जिल्हा जलसंधारण अधिकारीजि.प. जलसंधारण विभाग, वाशिम