लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने आकडेमोड केली असून, नुकसानग्रस्त शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अंदाजे ४५० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. दरम्यान, ज्यांनी पीक विमा भरला नाही त्या शेतकºयांच्या मदतीचा अंदाज मात्र अद्याप प्रशासनाला काढता आला नाही.वाशिम जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून अवकाळी पावसाने थैमान घालत शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला. त्यात पीक विमा भरणाºया आणि न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाचीही पाहणी करण्याच्या सूचना होत्या, तर नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानाचा तक्रार अर्ज पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या प्रक्रियेला २८ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. प्रत्यक्षात जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पीक विम्यापोटी भरले आहेत. पीक विमा उतरविणाºया शेतकºयांत ८५ हजार ३९५ कर्जदार शेतकरी असून, २ लाख ९ हजार ८९५ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. तर जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांच्या आधारे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई म्हणून मदत देण्यासाठी केलेल्या आकडेमोडीनुसार आजवरच्या अर्जांसाठी अंदाजे ३६९ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तथापि, अद्याप अनेक शेतकºयांच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या नसून, जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी आणि नुकसानाचे प्रमाण गृहीत धरता पीक विम्यापोटी नुकसानभरपाई म्हणून अॅग्रीकल्चर विमा कंपनीला वाशिम जिल्ह्यात जवळपास ४५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमही शेतकºयांना अदा करावी लागण्याची शक्यता पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि प्रशासनाने वर्तविली आहे. जिल्ह्यात शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेता अद्यापही तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, पीक विमा कंपनीच्या तालुका समन्वयकांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवारी तलाठी, कृषी सहायकांसह प्रशासकीय कर्मचाºयांच्या पथकांकडून प्रत्यक्ष पीक नुकसानाच्या पाहणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचाही समावेश असून, हे पथक गावोगावी फिरून शेताना प्रत्यक्ष भेटी देत पीक नुकसानाच्या नोंदी घेत आहे. दरम्यान, आता तालुका कृषी कार्यालयावर अर्ज स्वीकारणे बंद होणार असून, शनिवारपासून शेतकºयांना त्यांनी ज्या बँकेत पीक विमा भरला त्या बँकेकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले आहे.