शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 3:38 PM

वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि त्यामुळे गावागावात उडणारी त्रेधातिरपीट, शेतशिवारांमधील पिकांची पुरेशा पाण्याअभावी होणारी हानी. हे प्रकार थांबवायचे असतील तर प्रथम पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात वाशिम तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद...

गावागावात जल व मृद संधारणाची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी काय करणे अपेक्षित आहे?- दरवर्षीच जाणवणारी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणायची असेल तर गावागावात जल व मृद संधारणाची कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. अर्थात ही कामे माथा ते पायथा याप्रमाणे तथा शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शेतशिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तेथेच मुरला तर दुष्काळाला हरविणे सहजसाध्य होईल. पावसाळ्यात पूर आल्यास केवळ पाणी वाहत नाही तर त्यासोबत शेतातील सुपीक माती देखील वाहून जाते. त्यामुळे मृद व जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने करून पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासोबतच सुपीक मातीचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

यात कुठली कामे करणे आवश्यक आहे ?- सी.सी.टी, दगडी बांध, छोटा माती बांध, वृक्ष लागवड यासारखे उपचार खूप परिणामकारक ठरतात. माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबत वाहून जाणारी माती अडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील गावातील प्रत्येक व्यक्त्तीने किमान दोन तास श्रमदान केले तरी मृद व जलसंधारणाची कामे दर्जेदार होणे शक्य आहे. श्रमदानातून एक घनमीटर काम पूर्ण झाले तरी किमान हजार लिटर पाणी अडते. हेच पाणी भूगर्भात मुरण्यास मदत होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.गावे पाणीदार करण्यासाठी काय करता येईल?- शेतात जेथून पाणी वाहून जाते, त्याठिकाणी ६ मिटर गोलाई व ३ मिटर खोलीचा एक खड्डा तयार करून त्याचा बाजूला एक शोष खड्डा तयार करावा. मातीविरहित पाणी ‘रिचार्ज पिट’ मध्ये घेऊन उर्वरित पाणी बाहेर सोडावे. यामुळे गरजेनुसार शुद्ध पाणी भूगर्भात मुरण्यास मदत मिळते. परिणामी, भूगर्भाची पातळी वाढण्यासोबतच शेतातील सुपीक माती शेतातच थांबण्यास मदत मिळून भविष्यात गावे पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत