मंगरूळपीर : येथील ग्रामीण रूग्णालयाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. डॉक्टरांच्या कमतरतेने दररोज शेकडो रूग्ण अत्यवस्थ होताना आढळत आहे.
तालुक्यात सर्व सुविधायुक्त एकही दवाखाना नाही. ग्रामीण रूग्णालायात दररोज ३५०-४०० बाह्यरूग्ण तपासणी साठी येतात. सद्यस्थितीत येथे केवळ एक कायमस्वरूपी तर एक प्रभारी डॉक्टर आहे. शहरात एकही रूग्णालय नाही. तसेच रात्री ८ वाजता नंतर एकही दवाखाना उघडा नसतो. त्यामुळे आंतररूग्णांची सुध्दा संख्या मोठी असते. दिवसरात्र दवाखान्यात गर्दी असते. जेव्हा की किमान ५ डॉक्टरांची येथे नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देवून येथील समस्या निकाली काढाव्यात. नेहमी करीता दवाखाण्यात डॉक्टर हजर राहावे, यासाठी कठोर पावले उचलावीत. याकरीता जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी येथे ग्रामीण रूग्णालयास भेट दयावी. अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे.
आरोग्य हक्काची ऐसीतैसी !
कायद्यानुसार जो डॉक्टर रजीस्टर्ड आहे. त्यांना रूग्णसेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.जे डॉक्टरानी रूग्णसेवा नाकारली तर त्यांची डॉक्टर ही पदवीच रद्द होवू शकते. शहरात रात्री आठ नंतर सर्वच डॉक्टर आपले दवाखाने बंद करून मोबाईल स्विच आॅफ करणे, दवाखाण्याची चावी नाही, कार्यक्रमात बाहेर आहे इत्यादी बहाणे करतात. रूग्ण व त्याचे नातेवाईक यामुळे त्रस्त होवून अखेर अकोलाचा उपचार्थ मार्ग स्विकारतात. अनेकांना रस्त्यात मृत्यूने गाठल्याचे प्रकारही खूप आहे. त्यामुळे खाजगी आरोग्य यंत्रणा सुध्दा जागेवर आणणे आवश्यक आहे.
शिवसेना स्टाईलने आंदोलन करू - नाकाडे
आपल्याला प्राप्त माहिती नुसार, प्रशासन हेतूपुरस्सर मंगरूळनाथ ग्रामीण रूग्णालयाकडे दुर्लक्ष करीत आहे. या बाबत आम्ही आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांना कळवू. १५ दिवसात कार्रवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.असा इशारा शिवसेना शहर प्रमुख विवेक नाकाडे यांनी दिले.
शासन गरीबाचा वाली नाही - सौदागर
ग्रामीण रूग्णालयात गोरगरीबांना नाईलाजाने उपचारार्थ जावे लागते. परंतू शासन व प्रशासन गरीबांचे वाली राहिले नसल्याने त्यांना सामान्यांशी काहीही घेणेदेणे उरले नाही. अशी टिका कॉंग्रेस शहर अध्यक्ष जावेद सौदागर यांनी व्यक्त केली.