वाशिम : नेत्रदानाविषयी जनजागृतीसाठी जागतीक पातळीवर प्रयत्न सुरु असताना या पवित्र कार्यात आपला खारिचा वाटा उचलण्याचे काम वाशिम शहरातील ५२ युवकांनी केले आहे. या युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पाविषयीचा प्राथमिक अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सादर केला आहे.या ५२ जणांमध्ये वाशिम शहरातील विश्वहिंदू व छावा मंडळाच्या युवकांचा समावेश आहे. अंधत्वामुळे संबंधीत व्यक्ती त्याचे कुटूंब पर्यायाने देशाच्या प्रगतीवर विपरित परिणाम होत आहे. हा सर्व प्रकार थांबविण्यासह अंधाच्या जीवनात पुनदरूष्टी निर्माण करण्यासाठी नेत्रदान चळवळीला गती देण्याची खरी गरज आहे. अंधत्व आलेल्या व्यक्तींच्या तुलनेत नेत्रदान करणारांची संख्या कमीच असल्याने ही तफावत दूर करण्याच्या कामी खारिचा वाटा उचलण्याचा संकल्प वाशिम शहरातील विश्व हिंदू व छावा मंडळाने केला. छावा संघटनेद्वारे आयोजित नेत्र तपासणी व नेत्रदान शिबिरात १0५ नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ३१ जणांनी नेत्रदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी नेत्रदानासाठीचा प्राथमिक अर्ज भरुन तो संबंधित यंत्रणेच्या सुपुर्द केला.
५२ युवकांचा मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प
By admin | Published: September 15, 2014 12:44 AM