लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन २०१७-१८ अंतर्गत वाशिम जिल्हयात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्याकरीता २७ आॅगस्टपर्यंत पात्र संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालय वाशिमच्यावतीने करण्यात आले.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गटशेती, शेतीला आधुनिकतेची जोड देणे, विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. आता जिल्ह्यात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले. सदर संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीतकमी १० स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता एकूण ५०० शेतकºयांची यादी जोडणे अनिवार्य आहे. कायदेशिररित्या संस्था, आर्थिकदृष्टया सक्षम असणे गरजेचे तसेच 3 वर्षाचा लेखापरिक्षीत अहवाल आवश्यक राहणार आहे. कोणत्याही संघटनेच्या किंवा शासनाच्या काळया यादीत सदर संस्थेचे नाव नसावे. त्यासाठी स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. संस्थेचे स्वत:चे मुख्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करावयाचे असल्यास अथवा प्रस्तावित केल्यास त्याठिकाणच्या शाखा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व अनुषंगीक माहिती देणे आवश्यक आहे. आॅनलाईन प्रक्रियेसाठी पुरेशी मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. याशिवाय अन्य सोयीसुविधा व अटी पूर्ण करणाºया संस्थेने प्रादेशिक परिषदेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, वाशिम यांच्याकडे २७ आॅगस्ट २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन आत्मा कार्यालयाने केले.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नवीन १० गटांसाठी अर्ज मागविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:12 PM
वाशिम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन २०१७-१८ अंतर्गत वाशिम जिल्हयात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्याकरीता २७ आॅगस्टपर्यंत पात्र संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालय वाशिमच्यावतीने करण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गटशेती, शेतीला आधुनिकतेची जोड देणे, विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.आता जिल्ह्यात नवीन १० गटांसाठी प्रादेशिक परिषदेची निवड केली जाणार आहे.