गतवर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. उत्पन्नात काही प्रमाणात घट आली आणि दर्जाही घसरला. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने, या शेतीमालाचे भाव ११ हजारांपर्यंत पाेहोचल्याचे दिसले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यंदा या पिकाच्या क्षेत्रात वाढही झाली असून, आता नवे सोयाबीन बाजारात दाखल होत असतानाच, या शेतीमालाचे दर घसरू लागले आहेत. नव्या सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने कदाचित दरावर परिणाम झाला असावा, असे शेतकऱ्यांना वाटत होते, परंतु सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या शेतीमालाच्या दरात तर घसरण झालीच, शिवाय नवे, व जुने सोयाबीन जवळपास सारख्याच दरात खरेदी झाल्याने पुढील काळात सोयाबीनच्या दराची स्थिती काय राहील, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
००००००००००००००
दरावर परिणाम कशाचा...
गेल्यावर्षी ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीनसारख्या सायोबीन उत्पादक देशांत या पिकाचे उत्पादन घटल्याने मागणीत वाढ झाली होती, तर अद्यापही नव्या सोयाबीनची फारशी आवक बाजारात नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर नेमका कशाचा परिणाम झाला, हे कळणे कठीण झाले आहे.
-------------------
कोट:
मागील हंगामात सोयाबीनचा दर्जा घसरूनही चांगले दर मिळाले. त्यामुळे यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. आता नवे सोयाबीन बाजारात येत असतानाच, जुन्या सोयाबीनचेही दर घसरू लागले आहेत. त्यामुळे मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
- ज्ञानेश्वर शिंदे, शेतकरी.
०००००००००००००००
कोट:
सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने, यंदा सोयाबीनवर अधिक भर दिला. पण आता हे पीक काढणीवर आले असतानाच, सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असून, जुन्या सोयाबीनसह नवे सोयाबीनही एकाच दरात खरेदी केले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
- रामराव बारडे, शेतकरी.
००००००००००००००००००
सोयाबीनचे बाजारनिहाय अधिकाधिक दर...
बाजार समिती - जुने सोयाबीन - नवे सोयाबीन
वाशिम - ६३०० - ६२००
रिसोड - ६१३० - ५९००
कारंजा - ६५०० - ६३००
मानोरा - ६३५० - ६२००
मं.पीर - ६५०५ - ६३००
मालेगाव - ०० - ००