मानोरा : येथे १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नव्या सोयाबीन खरेदीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या मालाला ७,७७१ रुपये प्रति क्विंटलचा दर देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
येथील रामदेव कृषी बाजार(खासगी) येथे सोयाबीन खरेदीस १५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. मानोरा तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शेतातून ओले सोयाबीन मार्केटमध्ये विकायला आणले आहे. त्यालाही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
..................
शेतकऱ्यांचा सत्कार
मानोरा शहरातील रामदेव कृषी बाजारमध्ये सोयाबीन खरेदीस प्रारंभ करतेवेळी संचालक जुगल हेडा यांच्याहस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी जोगाराम जाधव (पार) या शेतकऱ्याचे प्रथम सोयाबीन मोजून घेण्यात आले. त्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमास गोपाल हेडा, मापारी, आडते यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.