वाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील विशाल वसंतराव केंदळे या शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार ६ सप्टेंबर रोजी नवीन सोयाबीन विक्रीस आणले. प्रथमच विक्रीसाठी आलेल्या नव्या सोयाबीनला लिलावात प्रति क्विंटल ५,७०१ रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक महेश कच्छवे व सचिव भगवानराव इंगळे यांनी दिली.
शेतकऱ्याचा केला सत्कार वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत लोणार तालुक्यातील बीबी येथील शेतकरी विशाल वसंतराव केंदळे यांनी सुमारे ३५ क्विंटल नवीन सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. विशाल केंदळे यांच्या सोयाबीनला लिलावात ५,७०१ रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आली. हंगामातील नवीन सोयाबीन शेतमालाचा मुर्हूत असल्याने विशाल केंदळे यांचा शाल श्रीफळ देऊन बाजार समितीचे सचिव भगवानराव (बबनराव) इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे शासकीय प्रशासक महेश कच्छवे तसेच बाजार समितीचे निरीक्षक वामन सोळंके, लेखापाल प्रविण लांडकर, पर्यवेक्षक उ. रा. महाले,पर्यवेक्षक ज.सो. बुधे, निरीक्षक रा.वि.वानखेडे, लिपीक यो. ल. बुंधे,धान्य प्रतवारी उ.द.मापारी, कनिष्ठ लिपीक रा.ग.चव्हाण, कनिष्ठ लिपीक मा.ह.गोटे, कनिष्ठ लिपिक ह. चि. खंडारे, कनिष्ठ लिपीक मो.मो. भालेराव, कनिष्ठ लिपीक गं.बु उदिवाले, शिपाई बा.म. इंगोले, तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोयर, ज्ञानेश्वर, व्यापारी दिलीप लाहोटी, आडते बबला देवाणी, गोविंदराव ठाकरे, तुळशीराम सावके, अमित बियाणी, गोविंद बियाणी, कृष्णा मानधने,गोविंद सारडा, अशोक वाघ, राहुल गांजरे, गोलु चौधरी व सर्व हमाल बंधू व मदतनीस बंधूची उपस्थिती होती.