शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

अखेर खंडाळा वीज उपकेंद्रासाठी नवे ट्रान्सफॉर्मर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 6:29 PM

शिरपूर जैन (वाशिम): खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसह रिसोड-मालेगावचे आमदार अमित झनक यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला, तर लोकमतनेही शेतकºयांच्या समस्यांबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून महावितरणचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन अखेर सोमवार २९ आॅक्टोबर रोजी खंडाळा वीज उपकेंद्रासाठी नवे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करण्यात आले. उर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या खंडाळा वीज उपकेंद्रात ५ एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर कार्यरत होते. मागील महिन्यात त्यापैकी एक ट्रान्सफॉर्मर लोड नसल्याचे कारण सांगून कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील वीज उपकेंद्रांत हलविण्यात आले. त्यामुळे शिरपूर व खंडाळा उपकेंद्र अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना सिंचनासाठी विज मिळत नव्हती. यासाठी विविध संघटना व शेतकºयांनी सतत विरोध अधिकाºयांना सुद्धा घेराव घातला. याप्रकरणी स्थानिक आमदार अमित झनक यांनीही कार्यकर्त्यासह वाशिम येथे अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला. त्यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी दहा ते पंधरा दिवसात नवीन ट्रांसफार्मर खंडाळा उपकेंद्रात करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, लोकमतनेही याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकºयांच्या समस्यांकडे महावितरणचे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन २९ आॅक्टोबर रोजी खंडाळा उपकेंद्रात नवे ५ एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले. हे ट्रान्सफॉर्मर येत्या दोन दिवसांत कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे खंडाळा वीज उपकें द्रांत शेतकºयांची वीज पुरवठ्याची समस्या सुटणार आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण