काेराेना काळ २०२० ते २०२१ मध्ये वाशिम शहरामध्ये ४१२ लग्नकार्ये पार पडली. यामध्ये २०२० मध्ये २७६, तर २०२१ मध्ये १३६ लग्नकार्ये पार पडल्याची नगरपरिषदेमध्ये नाेंद करण्यात आली आहे. पूर्वीच्याकाळी आषाढात लग्न झालेल्या मुली माहेरी यायच्या, कारण म्हणे आषाढात सासू, सासऱ्याचं ताेंड पाहिलं तर सासू, सासऱ्यांना ते चांगलं नाही, असं मानलं जाई. म्हणून त्या मुली माहेरी येतात. ही प्रथा आजही जाेपासली जात आहे.
.................
नवविवाहिता आई म्हणते
अनेक वर्षांपासूनची आषाढीला मुलीला घरी आणण्याची प्रथा आहे. काेराेना संसर्ग कमी झाला आहे. संसर्ग असता, तर विचार केला असता.
- रेखाबाई खैरे,
वाशिम
..........
नवविवाहिता म्हणते...
आषाढ महिन्यात आई-वडील मुलीची आतुरतेने वाट बघतात. मुलगी आपल्याकडे यावी, असे वाटत असल्याने त्यांना भ्रमनिरास करणे उचित नाही. तसेही काेराेना संसर्ग कमी झाला आहे.
- अवंती पाटील,
वाशिम
...........
कोरोनाकाळात विवाहांची नोंद
२०२० ....२७६
२०२१ ...१३६