वाशिम: शेलूबाजार येथून जवळच असलेल्या तपोवननजीक नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री १० वाजता मार्ग ओलांडत असताना वाहनाने जोरदार धडक दिल्याने निलगाय गंभीर जखमी झाली. निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सदस्यांनी या निलगायीवर वनविभागाच्या सहकार्याने उपचार करून जीवदान दिले.
तपोवननजीक नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री १० वाजता मार्ग ओलांडत असताना वाहनाने जोरदार धडक दिल्याने निलगाय गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती तपोवन येथील अश्विन येवले यांनी निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या वनोजा शाखेचे सदस्य चेतन महल्ले यांना दिली. या माहितीवरून चेतन महल्ले रात्रीच तात्काळ आपले सहकारी आदित्य इंगोले व सतीश यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबत वनविभागाला माहिती देऊन तपोवन येथील स्थानिक युवक व वनविभागाच्या मदतीने गंभीर जखमी निलगायीला रात्री १२ वाजता येडशी येथे वनविभागाच्या रोपवाटिकेत आणले. अपघातात निलगायीच्या पुढच्या पायाचे हाड बाहेर निघाले व कमरेला जबर मार लागला होता. पर्यावरण अभ्यासक गौरवकुमार इंगळे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आणि वन्यजीवप्रेमींनी कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे व वनरक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय डॉक्टर नीलकंठ घुगे यांनी सदर जखमी निलगायीवर उपचार केले. त्यामुळे निलगायीचे प्राण वाचू शकले.
===Photopath===
210221\21wsm_1_21022021_35.jpg
===Caption===
वन्यजीवप्रेमींमुळे वाचले निलगाईचे प्राण