शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नऊ गोदामांना मंजुरी

By admin | Published: February 19, 2017 2:04 AM

कृषी अधिका-यांची माहिती; ५0 टक्के अनुदान म्हणून १२ लाख ५0 हजार रुपये खात्यात जमा.

वाशिम, दि. १८- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तसेच राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान मिळून कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात १२ गोदामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी नऊ गोदामांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर उर्वरित गोदामांचे अनुदान संबंधितांनी नाकारले आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि गळीत धान्य, तेलताड अभियानांतर्गत कृषी विभागाच्यावतीने गोदामांसाठी बँक कर्जावर आधारित ५0 टक्के अनुदानाची गोदाम बांधकाम योजना राबविण्यात येते. या योजनेंसाठी ५0 टक्के अनुदानावर २५ लाख रुपये किमतीच्या गोदामाला मंजुरी देण्यात येते. यातील ५0 टक्के रक्कम ही बँक कर्जावर आधारित असल्याने बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या हिश्शाचा समावेश केला जातो. बँकेच्या कर्जमंजुरी पत्रानंतरच गोदामाला कृषी विभाग मंजुरी देते. योजनेच्या निकषानुसार कमाल २५0 मेट्रिक टन शेतमाल साठवणुकीची क्षमता असलेल्या गोदामासाठी लाभाथीर्ंना जागेची निवड करावी लागते. लाभार्थीसाठी विशेष जटील निकष नसले तरी, यामध्ये महिला, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांना प्राधान्य, गावाची जमीन आरोग्य पत्रिका असावी, ३0 टक्के महिलांना प्राधान्य, शेतकरी मासिक वर्गणीधारक होणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ सक्षम शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, वैयक्तिक शेतकरी इत्यादींना देण्यात येतो. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १२ अर्ज प्राप्त झाले होते. या सर्वच अर्जांंना कृषी विभागाच्यावतीने मंजुरी देऊन बँक कर्ज तत्त्वावर नऊ अर्जदारांनी आपल्या गोदामांच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत कृषी विभागाच्यावतीने संबंधितांना ५0 टक्के अनुदान म्हणून १२ लाख ५0 हजार रुपये खात्यात जमा केले आहेत. या योजनेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद असल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेला वाढता प्रतिसाद असल्यामुळे याबाबत कृषी विभाग अधिक सक्रिय आहे. या योजनेची माहिती घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा लागतो.