लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिमसह अन्य पाच शहरातील अग्निशमन यंत्रणा आग विझविण्यासाठी सुसज्ज आहे. मानोरा येथे चालक नसल्याने अग्निशमन वाहन जागेवरच आहे.आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे, शहरासह ग्रामीण भागात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी पाठविणे यासाठी शहराच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा असते. जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम येथे नगर परिषद कार्यालयाजवळ सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व रिसोड येथेही सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आहे. मानोरा नगर पंचायत येथे अग्निशमन वाहन आहे. परंतू, येथे वाहन चालविण्यासाठी अनुभवी कर्मचारी नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात अग्निशमन वाहन उभे आहे. कारंजा येथे अग्निशमन वाहन ठेवण्यासाठी अद्ययावत स्टेशनचा अभाव आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे. सुसज्ज स्टेशनचा अभावरिसोड, वाशिम व मालेगाव येथे सुसज्ज अग्निशमन स्टेशन आहेत. मानोरा येथे स्टेशनचा अभाव असल्याने गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उभी राहते. मंगरूळपीर व कारंजा येथे अद्ययावत स्टेशनचा अभाव आहे. येथे अद्ययावत स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. अद्ययावत स्टेशन होणे गरजेचे आहे.
अग्निशामकची गाडी चालवण्यासाठी मानोरा नगरपंचायतकडे अनुभवी कर्मचारी नाहीत. लवकर निविदा प्रक्रियेतून कर्मचाऱ्यांचा भरणा करून ती गाडी कामात आणण्यात येईल. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज आहे.- नीलेश गायकवाड, मुख्याधिकारी नगर पंचायत मानोरा