०००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : अनसिंग परिसरातील काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी जलस्त्रोत, जलकुंभातील पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित होणे गरजेचे आहे.
००
कर्मचाऱ्यांची १२ पदे रिक्त
वाशिम : रिठद परिसरातील महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज प्रभावित होत असल्याचे दिसून येते.
०००००
आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी चिखली परिसरात मार्गदर्शन करण्यात आले. चिखली येथे पुन्हा तीन रुग्ण आढळून आले.
०००
खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय
वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईनकडून जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाकडे वळणाच्या ठिकाणीच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी १ डिसेंबर रोजी केली.
........
डोंगरकिन्ही येथे आठ कोरोना रुग्ण
वाशिम : डोंगरकिन्ही येथे आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
...............
विमा संरक्षण देण्याची मागणी
वाशिम : रोजगार हमी योजनेवर कार्यरत मजूर, रोजगार सेवक यांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने गुरुवारी तालुका प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
०००
रोहयो कामासाठी नोंदणी करा !
वाशिम : शेतीचा हंगाम संपत आला असल्यामुळे रोजगारासाठी रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध होण्यासाठी मजुरांची नोंदणी आवश्यक आहे. रोजगारासाठी मजुरांनी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
००
ग्रामीण रुग्णालयाच्या दजार्साठी ठराव !
वशिम : शिरपूर जैन येथील आरोग्य वर्धिनी केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मालेगाव पंचायत समितीच्या मासिक सभेत यापूर्वीच मंजूर झाला. मात्र, जिल्हा परिषदेने यावर ठोस कार्यवाही केली नाही.