रिसोड : विविध पिकांवरील कीड आणि नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात कृषी अधिकारी, कर्मचारी हे शेतकºयांच्या बांधावर जाताना कोरोनासंदर्भात कोणतीही खबरदारी घेत नसल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. अनेक ठिकाणचे मार्गदर्शन कार्यक्रम केवळ छायाचित्रांपुरतेच मर्यादीत असल्याचेही दिसून येते.शेतकºयांना कृषीविषयक मार्गदर्शन मिळावे याकरीता बांधावर जाऊन शेतकरी समूहाला आवश्यक ते मार्गदर्शन करावे, अशा सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने रिसोड तालुक्यात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांतर्फे मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विविध पिकांवरील कीड, किटकनाशक फवारणी यासह कृषीविषयक माहिती देण्यासाठी शेताच्या बांधावर जाताना संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन यासंदर्भातील पथ्थे स्वत: पाळून शेतकºयांनाही त्याबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. भर जहॉगीर परिसरात बांधावर जाऊन मार्गदर्शन करताना ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’चा प्रकार सोमवारी दिसून आला. अनेक ठिकाणी शेतात जाऊन मार्गदर्शन कार्यक्रम हे केवळ छायाचित्र काढण्यापुरतेच मर्यादीत राहत असल्याचेही दिसून येते. याकडे कृषी विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
शेताच्या बांधावर जाऊन कृषी सहाय्यक, कृषी कर्मचाºयांनी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती माहिती द्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. तालुक्यात घडलेल्या या चुकीच्या प्रकाराविषयी संबंधित कृषी सहाय्यकाकडे विचारणा केली जाईल.- काव्यश्री घोलपतालुका कृषी अधिकारी, रिसोड