राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांना लाखो रुपये उपचारावर लाखो रुपये खर्च करावे लागले, तर अनेक जण अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले. आता ही लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. यासाठी जनतेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एसटीच्या प्रवासात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रवासी मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची दक्षता घेत नसल्याचे, तसेच चालक, वाहकही विना मास्क कर्तव्य बजावत असल्याचे अमरावती-औसा या बसमधील मंगरुळपीर-वाशिम या एक तासाच्या प्रवासादरम्यान आढळून आले.
--------
बॉक्स : एका तासाच्या प्रवासादरम्यान तोंडावर मास्कच नाही
१) चालक-
अमरावती-औसा या बसच्या चालकाने मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान तासाभराच्या प्रवासात एकदाही मास्क लावला नाही, तसेच केबिनमध्ये त्याच्या शेजारी तीन प्रवासीही बसविले होते.
२) वाहक-
एसटीच्या प्रवासात कोरोना संसर्गाची सर्वाधिक खबरदारी बाळगण्याचे काम वाहकाला करावे लागते. तथापि, मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान वाहकाने स्वत:च तासाभरात तोंडावर मास्क लावला नाही.
३) प्रवासी-
अमरावती-औसा बसमध्ये मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान आसनक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असताना काही जण उभ्याने प्रवास करीत असल्याचे आणि अनेकांना मास्क नसल्याचे दिसून आले.
------
बॉक्स: लोकमतचा एसटी बसप्रवास
१) बस- अमरावती-औसा
२) वेळ-१०.३५
३) प्रवासी ६५
-----------
बॉक्स : कुठल्या बसस्थानकावर किती चढले-उतरले
१) मंगरुळपीर-
अमरावती येथून कारंजामार्गे मंगरुळपीर येथे दाखल झालेल्या औसा आगाराच्या बसमध्ये मंगरुळपीर येथे १२ प्रवासी उतरले, तर १५ पेक्षा अधिक प्रवासी चढले. त्यात बिघाड झालेल्या दुसऱ्या एका बसमधील काही प्रवासीही या बसमध्ये चढविण्यात आले. त्यामुळे या बसमध्ये निर्धारित आसन क्षमतेपेक्षा १० ते १३ प्रवासी अधिक झाले होते.
-------------------
२) वाशिम : मंगरुळपीर येथून निघालेली औसा आगाराची बस वाशिम येथे सव्वा तासात पोहोचली. त्यात वाशिम शहरातील पुसद नाक्यावर १० प्रवासी उतरले, तर वाशिम आगारात पोहोचल्यानंतर १२ ते १५ प्रवासी उतरले, तर वाशिम आगारातून पुढे जाण्यासाठी आणखी १७ ते २० प्रवासी या बसमध्ये चढले. त्यामुळे बसमधील प्रवासी संख्या पुन्हा वाढली.
--------
===Photopath===
220621\22wsm_1_22062021_35.jpg
===Caption===
वाहक-चालकही विना मास्क