जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्ववत होत असून, अर्थचक्रही रुळावर येत असल्याचे दिसून येते. वाशिमसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे, तर दुसरीकडे शनिवारी जिल्ह्यात नव्याने एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७३६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
--------------------------------------५ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नवीन रुग्ण आढळून आला नाही, तसेच कोरोनातून एकही रुग्ण बरा झाला नाही. सध्या गृहविलगीकरणात ५ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एकही रुग्ण दवाखान्यात भरती नाही.
..........
मृत्यूसत्रालाही ब्रेक
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून, मृत्यूसत्रालाही ब्रेक लागल्याचे आशादायी चित्र आहे. सलग ३० दिवसांत एकही मृत्यू नाही. सध्या ५ रुग्ण सक्रिय असून, त्यांच्यामध्ये अतिशय सौम्य लक्षणे आढळून आलेली आहेत.