जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात नव्याने एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला. गत आठवड्यातदेखील एका दिवशी एकही रुग्ण आढळून आला नव्हता. १८ ऑगस्ट रोजी दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,६९३ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी ४१,०४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१४ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही, तर दोन जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १४ रुग्ण सक्रिय आहेत.