शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

दखल घेईना कोणी; म्हणून रस्त्यांवर साचतेय पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:46 AM

वाशिम : स्थानिक अकोला नाका परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत ...

वाशिम : स्थानिक अकोला नाका परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल कुणीच घेत नसल्याने परिस्थितीत सुधारणा कशी होईल? असा प्रश्न शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

अकोला नाका येथून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यासह महाविद्यालयाकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने रस्ता सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. गत एका वर्षापासून अकोला नाकास्थित रस्त्यावर खड्डे पडले असून, अद्याप याची दखल कोणीच घेतली नाही. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी साचत असल्याने या पाण्यातूनच मार्गक्रमण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. १० दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मित्तेवाड यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, दगड, गोटे, मुरूम टाकून या खड्ड्याची थातूरमातूर डागडुजी करण्यात आल्याने अपघाताची शक्यता अधिकच बळावली आहे. दगड, गोट्यावरून वाहन स्लीप होण्याचा धोका असल्याने चालकांना अधिक दक्षता घ्यावी लागत आहे. बांधकाम विभाग हा अपघाताची वाट तर बघत नाही ना? अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहेत.

...............

नागरिक काय म्हणतात?

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालविताना गैरसोयीला सामोरे जावे लागते; शिवाय वाहन स्लीप होऊन अपघाताची भीतीही आहे. व्यवस्थितरित्या खड्डे बुजवून गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा आहे.

- गजानन खुळे, वाशिम

.......

खड्ड्यांमुळे वाहन चालवावे कसे? असा प्रश्न पडतो. अकोला नाका येथे मुख्य रस्त्यावर खड्डे असल्याने आणि पाणी साचत असल्याने याकडे संबंधित यंत्रणा लक्ष केव्हा देणार? हा महत्वाचा प्रश्न आहे.

- बाबुराव शिंदे, वाशिम