वाशिम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थींना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून, जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील २७ हजार ७३६ लाभार्थींना सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे. रास्त भाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम (फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड) या तत्त्वानुसार धान्य वितरण करावे. लाभार्थींना याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, निरीक्षण अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले. शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करताना रास्त भाव दुकानदारांनी त्या शिधापत्रिकेचा क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील संपूर्ण तपशील, याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी, अशा सूचनाही पुरवठा विभागाने दिल्या.
00०००००
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक २७८१५०
प्राधान्य - १८११०९
अंत्योदय - ४८९७०
केशरी - २७७३६
००००००
अंत्योदयच्या
४८९७०
कुटुंबांना लाभ
१) कडक निर्बंधांच्या काळात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, शेतकरी गटातील लाभार्थींना एका महिन्यासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अंत्योदयच्या ४८९७० लाभार्थींसह प्राधान्य कुटुंब व शेतकरी गटातील लाभार्थींनादेखील मोफत अन्नधान्य मिळत आहे.
२) केंद्र सरकारनेदेखील दोन महिन्यांसाठी अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व शेतकरी गटातील लाभार्थींना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक रेशन दुकानांमधून मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे.
३) आता केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे.
०००००००००००००००
१ किलो गहू
१ किलो तांदूळ
००००
‘केशरी’च्या २७७३६ कुटुंबांना मिळणार धान्य
केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात रेशनचे गहू व तांदूळ हे धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या २७ हजार ७३६ आहे. कुटुंबातील प्रतिव्यक्ती एक किलो याप्रमाणे गहू व तांदूळ मिळणार आहेत. कुटुंबात चार सदस्य असतील तर चार किलो धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. गव्हाचे दर प्रतिकिलो ८ रुपये व तांदळाचे दर प्रतिकिलो १२ रुपये असे आहेत.
००००००००००००
कोट बॉक्स
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशनच्या गहू आणि तांदळाचे वितरण १ जूनपासून करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ हजार ७३६ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. पुरवठा विभागातर्फे पूर्वतयारी झाली आहे.
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम