-------------
वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले
वाशिम: जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन मिळण्यासाठी सादर केलेले प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. याकडे लक्ष पुरवून प्रस्ताव निकाली काढावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी २२ जुलै रोजी समाजकल्याण विभागाकडे केली.
---------
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा होतेय प्रभावित
वाशिम: मालेगाव तालुक्यात मेडशीसह इतर काही ठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांची ३५ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेख गणीभाई मित्रमंडळाने मंगळवारी केली.
---------
वर्गखोल्यांसाठी निधी मिळेना
वाशिम: विविध ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे निधीची मागणी नोंदविण्यात आली. अद्याप निधी मिळाला नसल्याने वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सरपंचांनी गुरुवारी केली.
---------------
जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना द्याव्यात !
वाशिम : जि.प. प्राथमिक शिक्षक यांचा ७ व्या वेतन आयोगाचा १ ला हप्ता जीपीएफमध्ये जमा करावा, मार्च २०१८ पासून जीपीएफ हप्ता जमाचे विवरण पावत्या देण्यात याव्या, अशी मागणी सतीश सांगळे यांनी २२ जुलै रोजी केली.
---------------
महिलांना मार्गदर्शन
वाशिम: महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने अंगणवाडी केंद्रात बुधवारी महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यक्रमात मातांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
------------
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान
वाशिम: कारंजा तालुक्यातील धामणी खडी परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
^^^^^^^^^^
शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
वाशिम: अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सदर मागण्या निकाली काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजनेपासून वंचित शिक्षकांनी २२ जुलै रोजी केली.
------------
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
वाशिम रिसोड तालुक्यातील महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता नसणे, महागाव ते सोनाटी शिवपर्यंत खडीकरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीप हंगामात यामुळे अनेक अडचणी उद्भवत असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पं.स. सदस्यांनी केली आहे.