वाशिम : अत्यंत ज्वलनशिल द्रव पदार्थांमध्ये मोडणारा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोलची दिवसाढवळ्या दुकानदारी थाटण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये अवैधरीत्या पेट्रोल विक्रीचा हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना त्याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रकार ह्यलोकमतह्णने गुरूवार, ११ मे रोजी केलेल्या "स्टिंग आॅपरेशन"मधून उजागर झाला.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तोंडगाव, वारा जहागीर, कळंबा महाली, कोंडाळा महाली, तांदळी शेवई, पार्डी टकमोर, काजळांबा, रिसोड तालुक्यातील केनवड, वाकद, लोणी, मोप, भर, मांगूळझनक, केशवनगर, चिखली, महागाव, आसेगावपेन, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी, शेंदूरजना आढाव, फुलउमरी, वाईगौळ, हातना, कुपटा, इंझोरी, मानोरा, मालेगाव तालुक्यातील मेडशी, करंजी, जऊळका रेल्वे, डोंगरकिन्ही, कारंजा तालुक्यातील कामरगाव, उंबर्डाबाजार, धनज बु., लोहगाव, दोनद, खेर्डा बु., खेर्डा कारंजा यासह मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी, वनोजा, तऱ्हाळा, शेलुबाजार, आसेगाव (पो.स्टे.) या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पानटपरी, हॉटेल्स, गॅरेज, पंक्चरची दुकाने आदींमधून पेट्रोलची अवैधरीत्या विक्री सुरू असून, त्यावर नियंत्रण लादण्याकामी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. संबंधित गावांमधील रस्त्यांवरून प्रवास करणारे नागरिक बॉटलद्वारे विक्री केले जाणारे हे पेट्रोल खरेदी करतात. यासाठी लिटरमागे निर्धारित दरापेक्षा १० ते १५ रुपये अधिक द्यावे लागतात. तथापि, अत्यंत धोकादायक ठरू पाहणाऱ्या या प्रकारावर प्रशासनाची कुठलीच पकड नसल्याची बाब ह्यस्टिंग आॅपरेशनह्णदरम्यान दिसून आली.अवैध विक्रीला पेट्रोलपंपच जबाबदार ?पेट्रोलपंपांवर कॅन अथवा ह्यबॉटलह्णमध्ये पेट्रोल भरून देणे नियमाच्या विरोधात आहे. असे असताना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरून पाच लिटर, दहा लिटरच्या कॅन तसेच पाण्याच्या खाली ह्यबॉटल्सह्णमध्ये पेट्रोल भरून दिले जात आहे. तेच पेट्रोल महामार्गावरील गावांमध्ये अधिक पैसे घेऊन विकले जात असल्याचे ह्यस्टिंग आॅपरेशनह्णमध्ये दिसून आले.
४२ गावांमध्ये पेट्रोलची विनापरवाना ‘दुकानदारी’!
By admin | Published: May 12, 2017 8:50 AM